Saturday, October 2, 2021

कोतवाली पोलीस स्टेशन मधिल रेकॉर्डवरील गुन्हेगार हत्यारा सह कोतवाली पोलीसांचे ताब्यात.

 
कोतवाली पोलीस स्टेशन मधिल रेकॉर्डवरील गुन्हेगार हत्यारा सह कोतवाली पोलीसांचे ताब्यात.
नगर दि  3 प्रतिनिधी


 जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानंतर जिल्ह्यामध्ये सध्या पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन सुरू केले असून कोतवाली पोलिसांनी  काल आरोपीच्या कबज्यातून दोन तलवारी जप्त केल्या आहे.दिपक सुरेश बे-हाडे वय-२३ वर्ष रा- सारस नगर मार्केट यार्ड त्रिमुर्ती चौक असे पकडलेला आरोपी चे नाव आहे. जिल्ह्यातील पोलिसांनी विविध प्रकारच्या कारवाया सुरू केल्या आहे. मार्केट परिसरामध्ये एक व्यक्ती तलवारीने दहशत करत आहे अशी बातमी सुद्धा मिळाली होती, त्यचा पोलिस शोध घेत होते. काल कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या पथकाने रात्रीचा सुमाराला मार्केट यार्ड परिसरामध्ये सापळा रचून  वरील आरोपीस ताब्यात घेतले आहे त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याच्या कबज्यातून दोन तलवारी हस्तगत केल्या आहे.सर पकडलेल्या आरोपी विरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी असे दोन गुन्हे दाखल आहेत अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे


सदरची कारवाई कोतवाली पोलीस ठाण्याचे जी टी इंगळे , विष्णु भागवत,  अभय कदम , नितीन गाडगे, प्रमोद लहारे,  सुमीत गवळी,  दिपक रोहकले, सुशील वाघेला यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only