Thursday, October 7, 2021

मिशन कवच कुंडल ः नगर शहरात उद्यापासून दररोज 21 नागरिकांचे लसीकरण


 नगर दि.7 प्रतिनिधी

कोरोना लसीकरणासाठी राज्यभरात मिशन कवच कुंडल राबविण्यात येत आहे. नगर शहरात पुढील सात दिवस दररोज 21 हजार नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्याचे नियोजन करत कृती आराखडा करण्यात आला आहे.

नियोजनाबाबत मनपामध्ये आज बैठक पार पडली. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त शंकर गोरे, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, आरोग्याधिकारी डॉ.सतीश राजूरकर आदी उपस्थित होते. 8 ते 14 ऑक्टोबर या सात दिवसात सात आरोग्य केंद्रांना दररोज 21 हजार डोस देण्याचे उद्दिष्ट दिले आहे. जवळपास दोनशेहून अधिक ठिकाणी नियोजन करण्यात आले आहे. सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती महापौर शेंडगे व आयुक्त गोरे यांनी दिली.

मनपा आरोग्य केंद्रांचे दररोजचे डोसचे उद्दिष्ट

नागापूर 3700, सावेडी 3700, मुकुंदनगर 3200, तोफखाना 2600, केडगाव 2600, माळीवाडा 2600, जिजामाता 2600

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only